थंडीत उडीद डाळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

थंडीत उडीद डाळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

उडदाची डाळ ही अतिशय पौष्टिक असून हिवाळ्यामध्ये नियमित सेवन केल्याने खूप फायदे होतात. 

जालना येथील आहार तज्ज्ञ गीता कोल्हे यांनी उडदाच्या डाळीचे आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत. 

उडदाची डाळ पचायला जड असल्याने शक्यतो हिवाळ्यामध्ये या डाळीचा समावेश आहारामध्ये केला जातो. 

वयोवृद्धांनी जास्त प्रमाणात उडीद डाळ खाणे टाळावे तर लहान मुलांना सूप देऊ शकतो.

उडदाच्या डाळीपासून इडली, डोसे, वरण, लाडू तसेच भाकरी देखील केल्या जाऊ शकतात. 

उडदाची डाळ ही बलवर्धक, शक्तीवर्धक असून कष्टकरी लोकांच्या आहारात या डाळीचा समावेश असावा. 

आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये असलेला ताण हलका करण्यासाठी उडदाची डाळ उपयोगी आहे. 

नैराश्य, ताण तणाव कमी करण्यासाठी देखील उडदाची डाळ अतिशय चांगले काम करते. 

सकाळी उठल्यानंतर अंगावर सूज येण्याची समस्या असलेल्या लोकांसाठी उडदाची डाळ अतिशय फायदेशीर आहे.