हिवाळ्यात बनवा मेथीचं लोणचं
हिवाळ्यात बनवा मेथीचं लोणचं
आंब्याचं किंवा लिंबाचं लोणचं सर्वांनाच आवडतं. मात्र तुम्ही कधी मेथीचे लोणचं खाल्लंय का?
विशेषतः शुगर किंवा संधिवात रुग्णांसाठी मेथीचे दाणे खाण्याचा सल्ला दिला जातो.
मेथीचे दाणे कडू असल्यामुळे सहज खाणे शक्य होत नाही. तेव्हा मेथीचं लोणचं उत्तम पर्यया आहे.
वर्धा येथील गृहिणी शालिनी अलोणे यांनी मेथीचे लोणचं नेमकं बनवायचं कसं ते सांगितलं आहे.
आणखी वाचा
हेडलाईनवर क्लिक करा.
हिवाळ्यात केस गळतीनं त्रस्त आहात? फॉलो करा या घरगुती टिप्स
थंडीत त्वचा कोरडी पडतेय? या सोप्या टिप्सने होईल मोठा फायदा
डासांच्या कटकटीतून मुक्ती हवीय? अंगणात लावा ही झाडे
मेथीचं लोणचं बनवण्यासाठी घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्याचीच गरज आहे.
अर्धी वाटी मेथीचे दाणे, हळद, तिखट, मीठ, मोहरीचे दाणे, जिरे, मोहरीची डाळ आणि लिंबाचा रस लागेल.
मेथीच्या दाण्यांना मोड आणून त्यात तिखट, हळद, मीठ आणि इतर साहित्याची फोडणी द्यायची.
लिंबाचा रस पिळून ते मिश्रण झाकून ठेवलं की मेथीच्या दाण्यांचं लोणचं तयार होतं.
मेथीच्या दाण्याचं लोणचं एक महिन्यानंतर राहत नाही त्यामुळे एकाच वेळी जास्त बनवू नये.
हिवाळ्यात गुळ खा होतील हे फायदे