भगवा झेंडा घेत मुंबईहून पायी अयोध्येला निघाली शबनम

हिंदू धर्मातील कोट्यवधी लोक भगवान श्रीरामाचे भक्त आहेत.

मात्र, तुम्हाला माहितीये का की, भगवान श्रीरामाची एक मुस्लिम तरुणीसुद्धा भक्त आहे.

ही मुस्लिम भक्त रामाच्या प्रतिष्ठापना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईहून पायी अयोध्येला निघाली आहे.

20 वर्षांची शबनम आपल्या मित्रांसह 8 दिवसांपूर्वी अयोध्येला निघाली आहे. 

भगवान श्रीरामाची भक्त असलेल्या या मुस्लीम तरुणीचे जागोजागी स्वागत केले जात आहे. 

राम सर्वांचे देव आहेत, असे शबनम म्हणते. 

मुंबई ते अयोध्या हे अंतर जवळपास 1600 किमी आहे. 

शबनमच्या या पायी यात्रेत मुस्लीम बांधवही तिचा आत्मविश्वास वाढवत आहेत.

शबनम आपल्या या पायी यात्रेत जय श्री रामचा जयघोष करत आहे.