परीक्षा न देता SBI मध्ये होऊ शकता Manager

बँकेत Manager ची नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने डेप्युटी मॅनेजरसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.

यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 7 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे.

इच्छुक उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अर्ज करू शकतात.

या भरती मोहिमेद्वारे 42 पदांवर भरती करण्यात येणार आहे.

उमेदवार 27 नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.

मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीद्वारे भरती केली जाईल.

यासाठी उमेदवारांचे किमान वय 25 आणि कमाल वय 40 वर्षे असावे.

अर्ज करू इच्छिणारे उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.