सर्वच क्षेत्रात महिला यशस्वी आणि सर्वोत्तम कामगिरी करीत आहेत, अर्थातच उद्योग क्षेत्र हे त्याला अपवाद नाही.
ग्रामीण भाग असो नाहीतर शहरी भाग महिला उद्योग क्षेत्राकडे वळत आहेत. यामध्ये यशस्वी होत आहेत.
अशीच कहाणी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून पुढे आलेल्या उद्योजिका महिलेची आहे.
पतीच्या दुःखद निधनानंतर पतीच्या स्वप्नांशीगाठ बांधत या महिलेने फुड्स गृह उद्योग सुरू केला असून तो यशस्वी करून दाखवला आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील या महिलेचे नाव राणी शिंदे आहे. राणी शिंदे याआधी चांदखेड गावात आशा स्वयंम सेविकेच काम करत होत्या.
पण अचानक पणे त्यांच्या पतीच 2022 मध्ये दुःखद निधन झालं. त्यामुळे सर्व घरातील व्यक्तीची आर्थिक जबाबदारी ही त्याच्यावर आली.
त्यानंतर श्रावणी या नावाने एक छोटासा फुड्स गृह उद्योग त्यांनी सुरु केला. दहा बाय दहाच शेड मारून पापडची मशीन घेतली आणि व्यवसाय सुरु केला.
यामधून महिन्याकाठी 1 ते दीड लाखा पर्यंत उत्पन्न मिळत आहे.
यामध्ये कुरडई, पापड, शेवई, सांडगे, मसाला कुटणे अशा सर्व पदार्थ बनवण्याच काम केलं जात, असं राणी शिंदे यांनी सांगितलं.
माजी सैनिक करतोय शेळीपालन!