रोज 10 गाजर खायची तरुणी, बनली नारंगी भूत!
स्कॉटलॅंडमध्ये राहणारी 21 वर्षीय तरुणी डाना रेंडलला तिचे मित्र ऑरेंज घोस्ट म्हणतात.
काही काळापासून तिची त्वचा नारंगी होत आहे.
तिच्या मित्र-मैत्रिणींना वाटलं तिनं टॅन स्प्रे वापरला आहे.
जेव्हा डानानं ब्लड टेस्ट केली तेव्हा वेगळंच कारण समोर आलं.
खरंतर हेल्थी डाएटमुळे डानाचा रंग ऑरेंज बनत होता.
डाना रोज 10 गाजर खात असे.
त्यामुळे तिच्या शरिरातील कॅरोटीनचे प्रमाण अधिक झालं होतं.
कॅरोटीनमुळे डानाच्या त्वचेचा रंग ऑरेंज होत होता.
तिनं गाजर खाणं बंद करताच ती नॉर्मल झाली.