Tesla ला टक्कर देण्यासाठी 28 ला येतेय Xiaomi SU7 इलेक्ट्रिक कार! 800km ची रेंज

स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi आता इलेक्ट्रिक व्हिकल बाजारात आणणार आहे. Xiaomi ने आपली पहिली इलेक्ट्रिक कार Xiaomi SU7 सेडान लॉन्च करण्याची घोषणा केलीये.

Xiaomi SU7  इलेक्ट्रिक कारची चर्चा दीर्घकाळापासून होत होती. पण आता कंपनी अधिकृतरित्या आपली कार EV टेक्नॉलॉजीच्या जगात लॉन्च करणार आहे.

आगामी 28 डिसेंबरला Xiaomi EV वरुन पडदा काढेल. कंपनीचे सीईओ लेई जूनने 'X' (पहिले ट्विटर)च्या माध्यमातून याचा खुलासा केला.

लेई जूनने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत म्हटलं की, या दिवशी केवळ तांत्रिक खुलासा केला जाईल. मात्र त्या दिवशी कोणतंही प्रोडक्ट लॉन्च होणार नाही.

नवीन Xiaomi SU7  ला एका अनुबंधाअंतर्गत बीजिंग ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री होल्डिंग कंपनी लिमिटेडद्वारे तयार केलं गेलंय. ही कार टेस्टिंग दरम्यान विविध प्रसंगी स्पॉट केली गेलीये.

ग्लोबल मीडिया रिपोर्ट्सनुसार Xiaomi SU7  सेडानची लांबी 4997 मिमी, रुंदी 1,963 मिमी, उंची 1455 मिमी आणि व्हीलबेस 3000 मिमी असेल.

कार न्यूज चायनाच्या रिपोर्टनुसार यात दोन वेगवेगळे व्हील साइजचे ऑप्शन मिळतील. जे क्रमशः 19 इंच आणि 20 इंच असतील. ही कार दोन व्हेरिएंटमध्ये येईल.

ही एक 5-सीटर सेडान कार आहे. याचा बेस मॉडलचा वजन 1,980 किलोग्राम आहे. लोअर ट्रिमसाठी टॉप स्पीड 210 किमी/तास आहे. तिथे याच्या टॉप मॉडलचं वजन 2,205 किलोग्राम आहे. याची टॉप स्पीड 265 किमी/तास असेल.

गिज्मोचाइनाच्या रिपोर्टनुसार, ही कार तीन ट्रिममध्ये लॉन्च केली जाईल. एक Xiaomi SU7 , दुसरी SU7 Pro आणि तिसरं फीचर लोडेड टॉप मॉडल SU7 Max असेल.

याच्या बेस मॉडलमध्ये 73.6kW ची बॅटरी मिळेल. जी 668 किमीपर्यंतची रेंज देईल. तसंच टॉप मॉडलमध्ये 101kWh ची बॅटरी दिली जाईल. जी सिंगल चार्जमध्ये 800 किमीची रेंज देईल.

बाजारात आल्यानंतर Xiaomi SU7  इलेक्ट्रिक कार मुख्यरित्या Tesla सारख्या ब्रांड्सला टक्कर देईल.