भोपळ्यापासून बनवलेले सुंदर लॅम्प करा खरेदी 

भोपळ्यापासून बनवलेले सुंदर लॅम्प करा खरेदी 

घर सजावट असो की इतर कुठली सजावट असो त्यासाठी आपण नेहमीच पडदे किंवा इतर वस्तू खरेदी करत असतो.

परंतु भोपळ्यापासून बनवलेला लॅम्प कधी पाहिलात का? तर सध्या पुण्यातील बाजारात या लॅम्पना चांगली मागणी असलेली पाहिला मिळते आहे.

फक्त घरच नव्हे तर कॅफेमध्ये देखील हे लॅम्प तुम्ही लावू शकता. या सोबतच भोपळ्यापासून बनवलेले पक्षांचे घरटे अशा अनेक वस्तू या बनवलेल्या पाहिला मिळतात.

पुण्यातील तन्मयी माळी ह्या भोपळ्यापासून लॅम्प बनवतात. त्यांची पाटीलनगर बावधन येथे दुकान आहे.

 याठिकाणी त्या भोपळ्यापासून बनवलेल्या लॅम्पची विक्री करतात.

यामध्ये पक्षांचे घरटे हे 200 रुपयांपासून, फ्लॉवर पॉट 400 रुपये तर लॅम्प 1000 रुपयांपासून मिळतात. या लॅम्पना चांगली मागणी आहे.

फॅशन जुनी पण ट्रेंड नवा, पाहा खणाच्या युनिक वस्तू