शॉपिंग हा महिलांचा आवडता विषय आहे. त्यातचं सध्या लग्नसराई सुरु असल्याने ड्रेस, ज्वेलरी, पर्सेस, साडी सोबतच चप्पल खरेदी आलीच.
त्यामुळे तुम्हाला मुंबईत स्वस्तात चप्पलांची खरेदी करता कुठे करता येईल याबद्दलच माहिती सांगणार आहोत.
मुंबईतील विलेपार्ले (पू) स्टेशनला लागून चप्पल लेन आहे. याठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या चप्पला अगदी स्वस्त दरात खरेदी करता येतील.
या चप्पल लेनमध्ये फॉर्मल, ट्रेडीशनल, कॅज्युअल चप्पल महिलासाठी मिळतात.
सध्या ट्रेंडिग असलेल्यापैकी हँडमेड डिजाईन असलेल्या आणि त्यात सुद्धा वेगवेगळे रंग आणि डिजाईनर असलेल्या मोजडी चप्पलही उपलब्ध आहेत.
काही चप्पलांच्या डिजाईनमध्ये काचा वापरल्या आहेत. या चप्पला आर्कषित करणाऱ्या कलेक्शनपैकी एक आहे.
चप्पलांवर काच वापरून डिजाईन केली आहे. लग्नसाठी ही चप्पल खरेदी करता येतील.
100 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत या चप्पल उपलब्ध आहेत.