आपण घेतलेली साडी किंवा ड्रेस हटके हवा असा प्रत्येक महिलेचा प्रयत्न असतो.
परंतु ड्रेस खरेदी करायचा असेल तर त्या ड्रेसवरचा दुप्पटा देखील तितकाच महत्वाचा असतो.
दुपट्ट्यांमुळे ड्रेस अधिक खुलून दिसतो. त्यामुळे हल्लीच्या काळात रंगीबेरंगी दुपट्ट्यांची प्रसिद्धी वाढत चाली आहे.
वेगवेगळ्या राज्यातील प्रसिद्ध दुपट्टा महिला वापरताना दिसत आहेत. ज्यामुळे एक एलीगंट लुक मिळतो.
त्यामुळे तुम्हाला पुण्यात स्वस्तात मस्त आणि वेगवेगळ्या प्रकारचे दुपट्टे कुठे मिळतील याबद्दच आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
पुण्यातील तुळशीबाग मार्केटमध्ये सम्राट शॉप 75 वर्ष जुनं दुकान आहे.
याठिकाणी स्टोल, ऑरगॅनझा, बनारसी, लखनवी, कॉटन, नेट या सर्व व्हराइटीमध्ये मॅचिंग दुप्पट्टे आहेत.
याठिकाणी तुम्ही 60 रुपयांपासून ते अडीच हजार रुपयांपर्यंत दुप्पट्टे खरेदी करू शकतात.