सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे ठीक ठिकाणच्या बाजारपेठा या लग्नसराईतील खरेदीमुळे गजबजलेल्या आहेत.
लग्नासाठी महिलाकडून साड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.
तुम्ही लग्नासाठी स्वस्तात साडी आणि शालू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मुंबईतील दादरमधील हिंदमाता मार्केटमध्ये खरेदी करू शकतात.
याठिकाणी तुम्हाला 5 हजारांचा शालू फक्त 2 हजार रुपयात खरेदी करता येईल.
मुंबईतील दादर येथील हिंदमाता परिसरातील प्राची फॅशन या दुकानात महिलांच्या महागड्या साड्या आणि शालू होलसेल दरात खरेदी करता येतील.
प्राची फॅशन हे दुकान होलसेल असून यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरर कंपनी सुरत येथे आहे. त्यामुळे या ठिकाणी महागातील महाग साडी ते शालू होलसेल दरात विकतात.
याठिकाणी अर्धरेशमी, रुंद काठाचा शालू, काठा पदराचा शालू, कोयरीकाठी शालू, खडीकामाचा शालू असे वेगवेगळे प्रकार मिळतात.