अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रांत आली आहे. मकर संक्रांत म्हटलं की हलव्याचे दागिने हे खास आकर्षण असते.
त्यामुळे बाजारातही आता हलव्याचे दागिने घेण्यासाठी महिलांची लगबग सुरु झालेली पाहायला मिळतेय.
मुंबईतील दादर मार्केटमध्ये अनेक दुकानांमध्ये हलव्याचे वेगवेगळे दागिने आपल्याला पाहायला मिळतात.
View All Products
दादर पश्चिम येथील छबीलदास रोडवरील मार्केटमध्ये साज नावाचं दुकान आहे. मकर संक्रांतीच्या निमित्तानं या दुकानात खास हलव्याचे दागिने पाहायला मिळतात.
बाजूबंदापासून ते अगदी छोट्याशा नथीपर्यंत आणि गळ्यातल्या मंगळसुत्रापासून ते कंबरपट्टयापर्यंत सगळ्या प्रकारची हलव्याचे दागिने या दुकानात आहेत.
या हलव्याच्या दागिन्यांमध्ये हार, नेकलेस, बिंदी, बांगड्या, कंबरपट्टा, बाजूबंद, मंगळसूत्र, कानाचे वेल, मुकुट असे अनेक प्रकारही पाहायला मिळतात.
80 रुपयांपासून या दागिन्यांची तुम्ही खरेदी करू शकता.