लग्नासाठी ‘इथं’ खरेदी करा मोत्यांचे दागिने

सध्या लग्नसराई सुरु आहे आणि अशातच नववधूची खरेदी देखील सुरु झालीये. पण त्यात सर्वात जास्त खरेदी करायची असते ती दागिन्यांची.

त्यातही जर महाराष्ट्रीयन नववधू असतील तर जसे मराठी उखाणे महत्त्वाचे असतात, तसंच मोत्यांच्या दागिन्यांना सर्वात जास्त पसंती दिली जाते.

मोत्यांच्या दागिन्यांनी कोणत्याही नववधूच्या सौंदर्यात जी भर पडते ती अगदी सोन्याच्या दागिन्यांनीही येत नाही.

त्यामुळे पुण्यात तुम्हाला हे दागिने कुठे मिळतील याबद्दल माहिती सांगणार आहोत.

पुण्यातील पिंपरीचिंचवड मध्ये अनेरी यादुकानात आकर्षक असे मोत्यांचे दागिने मिळतं आहेत.

यामध्ये तन्मणी, तोडे, बाजूबंद, मोती चोकर, मोठे नेकलेस यांचा समावेश आहे.

या दागिन्यांच्या सेटची किंमत 2 हजार रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंत आहे, अशी माहिती अनेरी दुकानाचे संचालक अंकित गळा यांनी दिली.

फक्त 99 रुपयांत खरेदी करा ‘इथं’ ड्रेस मटेरिअल