महाराष्ट्रीयन लग्न म्हटलं की, लग्नासाठी साड्यांचे प्रकार अनेक आहेत. लग्न ठरलं की, लग्नाची साडी खरेदीला सुरूवात होते.
सध्या बाजारपेठेत काही शालू सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. आजही अनेक लग्नांमध्ये शालू या साडीचा प्रकार नेसला जातो.
अनेकांना लग्नासाठी भरजरी शालू हा प्रकार आवडतो.
त्यामुळे आज आपण सध्या पुण्यातील मार्केटमध्ये ट्रेंडिंगमध्ये कुठले शालू आहेत हे पाहणारं आहोत.
पुण्यातील पिंपरीचिंचवड मधील लक्ष्मी सिल्क या दुकानात तुम्हांला शालूचे अनेक प्रकार मिळतील.
नववधूसाठी 2500 रुपयांपासून ते 30 हजार रुपयांपर्यंतचे शालू या ठिकाणी उपलब्ध आहेत.
यामध्ये बालगंधर्व पैठणी, बनारसी शालू, चंदेरी, कांचिपुरम, जरतारी, उपाडा सिल्क, काठापदराची साडी, कोटा सिल्क असे प्रकार ट्रेंडिंगमध्ये आहेत.