थंडीच्या दिवसात उबदार पांघरून घेऊन झोपी जायला बऱ्याच जणांना आवडते अशातच सर्वात उबदार अशा पांघरूणामध्ये घोंगड्याचा समावेश होतो.
हातमागवर विणलेली किंवा मशीन वर बनवलेली अशी अनेक प्रकारची घोंगडी बाजारात उपलब्ध असतात.
कोल्हापुरातही पट्टणकोडोली आदमापूर अशा ठिकाणी हे घोंगडी ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
याच ठिकाणी ही घोंगडी बनवली जात असल्यामुळे बाहेरच्या विविध भागातून त्यांना मागणी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात असणाऱ्या आदमापूर येथे श्री बाळूमामा देवस्थान मंदिरामुळे अनेक भक्तांची मांदियाळी असते.
View All Products
याच परिसरात घोंगडी विक्री करणाऱ्या शीला शहाजी सनगर या महिलेने घोंगड्यांच्या किंमतीबद्दल माहिती दिली आहे.
शीला संघर यांच्या दुकानात मशीनवरील काळी घोंगडी 350 रुपयांपासून ते 700 रुपयांपर्यंत, दगडी रंगाची मशीनवरील घोंगडी 800 रुपयांपर्यंत आहे.
पांढरे लोकर मिक्स असणारे मशीनवरील 1200 रुपये, हातमागावर विणलेली ओरिजनल घोंगडी 1500 रुपयांपासून पुढ आहे.