सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे लग्न सराईच्या खरेदीची लगबग पाहिला मिळत आहे.
अशातच बाजारपेठेत महिलांच्या साड्यांच्या खरेदीला वेग आलेला आहे.
तुम्ही देखील लग्नासाठी साडी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर मुंबईतील दादर मधील हिंदमाता मार्केटमध्ये ट्रेडिंग साड्या खरेदी करू शकतात.
दादर मधील हिंदमाता मार्केट परिसरात असलेले प्राची फॅशन नामक हे दुकान महिलांच्या साड्यांचे होलसेल दुकान आहे.
या ठिकाणी महिलांच्या विविध प्रकारच्या साड्या अगदी स्वस्त दरात खरेदी करता येईल.
या ठिकाणी महिलांच्या साड्यांची किंमत 150 रुपयांपासून सुरू होते.
त्याचप्रमाणे लग्नासाठी लागणाऱ्या हेवी जड साड्यांची किंमत या ठिकाणी 500 रुपयांपासून सुरू होते ते 6 हजार रुपयापर्यंत उपलब्ध आहेत.
काटपदर, शालू, कथान सिल्क, कांजीवरम, पैठणी, मोर पैठणी, पोपट पैठणी अशा विविध प्रकारच्या ट्रेडिंग साड्या या ठिकाणी खरेदी करता येईल.