सध्या हिवाळा सुरु आहे. हिवाळा म्हंटल की त्यासोबत अनेक सिझनल पदार्थ खाण्यासाठी खवय्ये आतुरलेले असतात.
थंडीमध्ये अगदी सर्वांच्याच आवडीचा फळ प्रकार म्हणजे स्ट्रॉबेरी.
थंडीतील स्ट्रॉबेरी सीजन सुरु झाला असल्यामुळे स्ट्रॉबेरी पासून तयार केलेल्या अनेक पेय आणि डेझर्ट प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत.
यामध्ये स्ट्रॉबेरी मिल्क शेकच नव्हे तर लंडन स्टाईल स्ट्रॉबेरी नट्टेलाला हा प्रकार मुंबईत खवय्यांना खायला मिळतं आहे.
मुंबईतील दादरमधील गांधी चौक परिसरात असलेले राहुल कॅफे नामक स्टॉलवर थंडीतील विशिष्ट सीजनल ड्रिंक मिळत आहेत.
या ठिकाणी स्ट्रॉबेरी मिल्क शेक आणि स्ट्रॉबेरी नट्टेला खाण्यास मुंबईकर खवय्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
लंडन स्टाईल स्ट्रॉबेरी नट्टेला हा एक डेजर्ट प्रकार आहे. यात स्ट्रॉबेरी स्वच्छ धुऊन साफ करून नटेला चॉकलेटमध्ये डीप केले जाते.
ही चॉकलेट डेप स्ट्रॉबेरी चवीला गोड आंबट अशी लागते.
या प्रकाराला भारताबाहेर देखील आवडीने खाल्ले जाते, अशी माहिती कॅफे मालक राहुल कदम यांनी दिली आहे.