देशातील जवळजवळ सगळ्याच भागात मान्सूनती सुरुवात झाली आहे.
त्यामुळे पावसात वाहन चालवणाऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचते
त्यामुळे कुठेही पाणी साचलेले दिसले तर सावध व्हा, शक्यतो महामार्गावर सावध होण्याची जास्त गरज आहे
महामार्गावर पाणी साचल्यामुळे गाड्यांच्या टायरचं रस्त्याशी संपर्क होत नाही, ज्यामुळे ते हवेत असतात.
याला एक्वाप्लॅनिंग म्हणतात, जे धोकादायक असू शकतं
त्यामुळे रस्त्यावर पाणी साचलेले दिसले त्यावरुन वेगानं इतरांवर पाणी उडवत न जाता वेग कमी करणे शहाणपणाचे ठरेल.
ॲक्वाप्लॅनिंगमुळे महामार्गावर अनेकदा अपघात घडतात. कारण वेगामुळे गाडीवर नियंत्रण रहात नाही आणि पाणी साचलेल्या भागात गाडी रस्त्यावर न चालता थोडीफार हवेत असते.