केळीच्या पानात मोमोज कधी खाल्लेत का?

आपल्यातील अनेकांना मोमोज खायला अतिशय आवडतात.

यामध्ये आजवर तुम्ही चिकन किंवा व्हेज, फ्राईड किंवा स्टीम केलेले मोमोज खाल्ले असतील.

पण कधी केळीच्या पानात ग्रेव्ही सोबत उकडून घेतलेले मोमोज खाल्ले आहेत का? नाही ना? तर हेच मोमोज तुम्हाला ठाण्यात खायला मिळतील.

ठाण्याच्या अष्टविनायक चौक परिसरात असलेले हे स्पाइस फाइव सिक्स नामक फूड ट्रक एक तरुणी चालवते.

सृष्टी कांबळे असे या तरुणीचे नाव आहे. सृष्टीने हॉटेल मॅनेजमेंट केले असल्यामुळे तिला विविध प्रकारचे पदार्थ तयार करण्याची भरपूर आवड आहे.

पात्रा मोमोज हे चिकन त्याचप्रमाणे पनीरचे देखील तयार केले जातात. पात्रा मोमोज हे केळीच्या पानात ग्रेव्ही सोबत उकडून घेतले जातात.

अगदी 40 ते 100 रुपयांचा आत मोमोज सोबत आणखीन स्नॅक्स पदार्थांचा या ठिकाणी आस्वाद घेता येईल.

खान्देशातील मांडे कसे बनतात?