तुमच्या रोजच्या या सवयी खराब करतात TV आणि AC चं रिमोर्ट
बहुतांश वेळा असं होतं की आपण कितीही चांगल्या कंपनीचा रिमोर्ट घेतला तरी तो खराब होतो.
मग असा प्रश्न पडतो की हा फॉल्ट आपला आहे की कंपनीचा. पण यासाठी कधीकधी रिमोर्ट नाही तर तुमच्या सवयी कारणीभूत असतात.
लहान मुलांपासून लांब ठेवा. ते पाडतात किंवा त्याला आदळ-आपट करतात ज्यामुळे सर्किट खराब होते.
रिमोर्टला चुकीच्या पद्धतीने वापरु नका त्यासोबत येणारं युजर गाईड फॉलो करा.
रिमोर्टचं धुळीपासून संरक्षण करा. धुळीचे कण आणि घाण त्यात बसल्यामुळे रिमोर्ट खराब होऊ शकतो
अनेक दिवस रिमोर्टचा वापर करणार नसाल तर त्यातील सेल किंवा बॅटरी बाहेर काढून ठेवा. यामुळे गंज लागणार नाही.
थेट उन्हात रिमोर्ट ठेवू नका किंवा ऊन येणाऱ्या जागात ठेवू नका. उन्हामुळे सेलची बॅटरी डाऊन होऊ शकते किंवा खराब होऊ शकते.
जेवताना खाताना बाजूल रिमोर्ट घेऊन बसू नका, त्यामध्ये खाण्या-पिण्याचे पदार्थ पडले की ते खराब होते.
ओल्या हातांनी रिमोर्टला स्पर्श करु नका. पाण्याचा एक थेंब सुद्धा रिमोर्टचं सर्किट खराब करण्यासाठी पुरेसं आहे.
रिमोर्टला सारखं सारखं पाडल्याने देखील त्यातील सर्किट खराब होतं. त्यामुळे रिमोर्टला सुरक्षित ठिकाणी ठेवा.