देशातील अनेक तरुण आपले करिअर चांगले घडावे म्हणून इंजिनिअर क्षेत्राकडे जातात. त्या क्षेत्रात काही काळ काम देखील करतात.
परंतु हे सगळं असताना आपली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करणं हे अनेकांच स्वप्न असत किंवा परिस्थितीमुळे ते काम कराव लागत.
मात्र, परभणी जिल्ह्यातील एका तरुणाने इंजिनिअर क्षेत्रातील आपली नोकरी सोडून गाडीवर पुण्यात ग्राहकांपर्यंत हळकुंडापासून हळद विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याच्या हळद विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील या तरुणाचे नाव आनंद काळबांडे आहे.
आनंद काळबांडे हा छत्रपती संभाजीनगरमधील एका कंपनीमध्येमध्ये इंजिनिअर म्हणून कामाला होता.
पण गावाकडे असलेल्या शेतीमधील हळदीला भाव मिळत नाही. म्हणून त्याने नोकरी सोडून हळद विकण्याचा निर्णय घेतला आहे.
यामधून तो थेट शेतकरी ते ग्राहक म्हणजे लोकांच्या घरापर्यंत जाऊन हळद दळून विक्री करतो.