ZP च्या विद्यार्थ्यांना नव्या जगाचं ज्ञान !
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत अनेक प्रयोग राबवले जातायत.
बीड जिल्हा परिषदेच्या शाळा देखील यामध्ये आघाडीवर आहेत.
विद्यार्थ्यांना बदलत्या जगात यशस्वी होण्याचं शिक्षण देणाऱ्या या शाळेतील शिक्षकाचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव करण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यातील अण्णासाहेब घोडके यांची प्रयोगशील शिक्षक म्हणून ओळख आहे.
ते सध्या पारगाव जोगेश्वरी येथील झेडपी शाळेत पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.
ते शाळेत वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतात. त्यांच्या याच उपक्रमाची दखल राज्य सरकारनं घेतलीय.
राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या सावित्रीमाई फुले राज्यशिक्षण गुणगौरव पुरस्काराने (2022-23) त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय शैक्षणिक पुरस्कार मिळण्यासाठी 17 निकष सरकारनं निश्चित केले आहेत. हे सर्व निकष मी पूर्ण केले.
यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोबोटिक्स या विषयावर मी मोठं काम केलंय.
21 शतकातील कौशल्य विकासाच्या दृष्टीने रोबोटिक्स चा आपण कशा पद्धतीने उपयोग करू शकतो याच्यावरती मी एक प्रोजेक्ट तयार केला होता.
हा प्रोजेक्ट शाळेत राबवला. यामधू विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञनाची अधिक माहिती झाली.
हा उपक्रम शाळेत राबवल्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांनाही सादर केला.
रोबोटिक्सच्या उपक्रमासाठी बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावलाय, अशी माहिती घोडके यांनी दिली.
बागेतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे!
Learn more